ठाणे : डोंबिविलीतील इमारतीला भीषण आग | पुढारी

ठाणे : डोंबिविलीतील इमारतीला भीषण आग

पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाण्यातील डोंबिवली पूर्वमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (दि. १३) दुपारी घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी नसल्याची माहिती ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.

डोंबिवली पूर्वेकडील लोढा पलावा टाउनशिपच्या फेज २ मधील कासा ऑरेलिया इमारतीमध्ये दुपारी १.२३ च्या सुमारास ही आग लागली. 8व्या मजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण इमारतीमध्ये ही आग पसरली. दरम्यान इमारतीमधील सर्व रहिवाशी बाहेर आल्याने कोणतीही जीवीतहानी न झाली नाही. नुकतेच बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यापर्यंतच रहिवाशी आहेत. ८ व्या मजल्यावर लागलेली ही आग १८ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुपारी ३ च्या सुमारास ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

हेही वाचा

Back to top button