

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा: वसईत बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ बागा, पिकांवर परिणाम झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी मध्यरात्री नंतर अवकाळी पावसाने वसईत दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाची शक्यतेनुसार वसई तालुक्यात रात्री जोरदार पाऊस बरसला.
या पावसामुळे चणा, तूर, वाल, उडीद सारखी द्विदल पिके, फळबागा, सफेद कांद्याप्रमाणेच कमी ओलाव्याची इतर भाजी पिके समुद्रकिनार्यावर सुकण्यासाठी टाकलेली मासळी व विटभट्टी व्यवसायावर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. वीट उद्योग सुरू होऊन केवळ महिना उलटला असून पुन्हा अवकाळी पावसाने शेतकरी, मच्छिमार, वीट व्यवसायिक धास्तावले आहेत.