पालघरात बंदी असलेल्या चायनीज मांज्याची विक्री?,विक्रेत्यांवर होणार कारवाई | पुढारी

पालघरात बंदी असलेल्या चायनीज मांज्याची विक्री?,विक्रेत्यांवर होणार कारवाई

पालघर ः पुढारी वृत्तसेवा :  पालघर शहरात सध्या पतंग आभाळात उडताना दिसू लागले आहेत. पतंग उडवताना अनेक लोक एकमेकांची पतंग कापण्यासाठी धारधार मांजा वापरत असतात. भारतात चायनीज मांज्यावर विक्री करण्यासाठी बंदी आहे. हा चायनीज मांजा अनेकांच्या जीवाचा बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. शहरात हा मांजा विक्रीला आला असल्याची चर्चा सुरू आहे. यावर पालघर पोलीस सतर्क झाले असून ते अश्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किंद्रे यांनी पुढारीला दिली.

संबंधित बातम्या 

पालघर शहरात मोठ्या प्रमाणात संक्रांत निमित्त पतंग उडवले जातात. पालघर शहरात सध्या अनेक लोक सकाळ संध्याकाळी आत्तापासून पतंग उडवताना दिसत आहेत. शहरात ठिकठिकाणी पतंगाचा मांजा लटकटताना दिसत आहेत. शहरात अनेक लोक दुचाकीवरून सायकल वरून रोड ने जात असताना पुढच्या बाजूला लहान मुलांना बसवत आहेत. अश्या वेळी मांज्याने गळा कापला जाऊ शकतो. अनेक पक्षी यांच्या पंखात मांजा अडकून पक्षी जखमी होतात. लहान मुलांना पुढे बसवताना त्यांच्या गळ्याला मऊ कपडा गुंडाळावा स्वतःलाही काळजी घ्यावी वाहने जास्त वेगाने चालवू नये. कुठे मांजा आढळून आल्यास सावधानी बाळगा. जर कोणी चोरून चायनीज मांजा विकत असेल तर पोलिसांना कळवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर पोलीस चायनीज मांजा विक्री करण्यावर कडक कारवाई करणार आहेत. तश्या सूचना आम्ही अंमलदार यांना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. कोणाला चोरून मांजा विकणारे माहीत असतील त्यांची माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
-दत्तात्रय किंद्रे, पोलीस निरीक्षक , पालघर पोलीस ठाणे.

पालघर मधील नागरिकांनी कुठे पक्षी मांज्यात अडकून जखमी झाले असेल तर आम्हाला कळवावे. आपले सण साजरे करताना मुक्या प्राण्यांना पक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
-लीनेट डिसुझा, चव्हाण, आस्था पशू प्राणी कल्याण संस्था.

Back to top button