Palghar News: पालघर जिल्ह्यात दगडी कोळशास वाढती मागणी

Palghar News
Palghar News

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा: पालघर जिल्ह्यात पारंपरिक वीट व्यवसाय आजही तग धरून असल्याने व्यवसायातील महत्वाचा घटक असलेल्या दगडी कोळश्याला वाढती मागणी आहे. यासाठी कित्येक महत्वाच्या नाक्यांवर कोळसा डेपो निर्माण झाले असून तेथून वीट व्यावसायिक कोळसा खरेदी करून भट्टीचा आवा रचत आहेत. (Palghar News)

दरसाल पावसाळा संपल्यावर अनेक ठिकाणी व्यावसायिक वीट तयार करण्याच्या कामास लागले आहेत. पालघर जिल्ह्यात तसेच वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीट उद्योजक व्यवसाय करुन आपला उदर निर्वाह करतात.या वीट व्यवसायाला लागणारा दगडी कोळसा विकणारे व्यापारी सध्या ठीक ठिकाणी हा दगडी कोळसा विकत आहेत. (Palghar News)

Palghar News: वातावरणावर वीट व्यवसाय अवलंबून

वीटा तयार करताना भाताचा तुस, चांगली लाल, काळी माती लागते. मात्र थापलेल्या तयार कच्च्या विटा भाजण्यासाठी खास दगडी कोळसा लागतो जो महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली यासह छत्तीसगड येथील विलासपूर या भागातून आणला जातो. असा दगडी कोळसा पुरवणारे व्यापारी उद्योजक सध्या दगडी कोळसा डेपो टाकून त्याची विक्री करीत आहेत. चुरी म्हणजे बारीक कोळसा, रोडी थोडा मोठा कोळसा, स्टीम म्हणजे मोठा कोळसा असतो. अकरा ते बारा हजार रुपये टन भाव सुरू आहे. सध्या वातावरण बेभरवश्याचे झाले आहे. कधीही पाऊस पडतो विटा तयार झाल्यावर कच्चा विटा पावसात वितळून जातात त्यामुळे वातावरणावर हा सगळा व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे फार कमी वीट व्यावसायिक सध्या या धंद्यात उतरत आहेत. अनेकांनी हा व्यवसाय सोडून अन्य कामे सुरू केलीत.

सिमेंट, राखेच्या विटा मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात

त्यात सध्या अत्याधुनिक सिमेंटच्या तसेच राखेच्या विटा मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात. यासाठी अत्याधुनिक राख व इतर साहित्य वापरले जाते त्या विटांची किंमत मातीच्या विटा पेक्षा खूप कमी असते. अद्यावत मशीन द्वारे त्या केल्या जात असल्याने स्वस्तही असतात त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. पण मातीच्या पारंपरिक विटा अजूनही काही लोक वापरतात.या विटांच्या घरामध्ये थंडावा राहतोच पण त्या टिकाऊ सुद्धा असतात .मात्र सिमेंटच्या विटा पेक्षा महाग असतात .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news