Eco Friendly Ganesha Idols | 70 % ग्राहकांची पर्यावरणपूरक बाप्पांना पसंती; ठाण्यात शाडूच्या मूर्तींची तुफान मागणी!

Eco Friendly Ganesha Idols | 70 टक्के ग्राहकांची पर्यावरणपूरक बाप्पांना पसंती
Eco Friendly Ganeshotsav
Eco Friendly GaneshotsavFile Photo
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरातील गणेशमूर्तींच्या बाजारपेठेत लगबग वाढली आहे. घराघरांत बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच यंदा गणेशमूर्तींच्या निवडीमध्येही बदलते ट्रेंड स्पष्टपणे जाणवत आहेत. विशेषतः पर्यावरणपूरक मूर्तींना वाढती मागणी असून, मूर्तीचे रूप, आकार, रंग आणि त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य याबाबतही गणेशभक्त अधिक जागरूकपणे माहिती घेताना दिसत आहेत.

Eco Friendly Ganeshotsav
Deputy CM Eknath Shinde | ठाणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणार नवी गती

ठाण्यातील काही मूर्ती विक्री केंद्रांमध्ये यंदा पर्यावरणपूरक मूर्तींच्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. वसंत विहार परिसरातील सिद्धिविनायक आर्टमध्ये सुमारे ७० टक्के ग्राहक पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी करत असल्याचे येथील विक्रेते सुखमणी यांनी सांगितले.

गेल्या १६ वर्षांपासून मूर्ती विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या या केंद्रात दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती उपलब्ध आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू माती किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने तुलनेने कमी हानिकारक साहित्यापासून तयार केलेल्या मूर्तींना यंदा अधिक पसंती मिळत आहे.

विसर्जनानंतर मूर्तींचे विघटन, जलप्रदूषण आणि नैसर्गिक जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबतची जागरूकता वाढल्याने अनेक कुटुंबे मूर्ती खरेदीपूर्वी तिचे साहित्य, रंग आणि विसर्जनाची पद्धत याबाबत विचारणा करत आहेत.
घरगुती गणपतींसाठी दोन ते तीन फुटांच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर मोठ्या घरगुती मंडळे किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून चार ते पाच फुटांच्या मूर्तींची निवड केली जात आहे. जागेची उपलब्धता, सजावटीचा आकार आणि विसर्जनाची सोय यांचा विचार करून मूर्तीचा आकार निश्चित करण्याकडेही नागरिकांचा कल आहे.

Eco Friendly Ganeshotsav
Thane Railway Station: ठाणे रेल्वेस्थानकाने घेतला मोकळा श्वास

'बाप्पा'च्या रूपापेक्षा पर्यावरणाचा विचार महत्त्वाचा

गणेशमूर्ती खरेदी करताना केवळ मूर्ती आकर्षक दिसते का, याऐवजी ती पर्यावरणपूरक आहे का, याकडेही नागरिकांचे लक्ष वाढले आहे. काही गणेशभक्त शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक किंवा पर्यावरणपूरक रंग आणि कमी सजावटीच्या मूर्तींना प्राधान्य देत आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींच्या प्रचारामुळे मागील काही वर्षांत या प्रकारच्या मूर्तींबाबत ग्राहकांची माहिती वाढल्याचे विक्रेत्यांचे निरीक्षण आहे.

पारंपरिक बाप्पांसोबत नव्या संकल्पनांचीही चलती

  • विविध रूपे व आकार : गणेशमूर्तींच्या रूपामध्येही यंदा विविधता पाहायला मिळत आहे. पारंपरिक, प्रसन्न आणि सात्त्विक रूपातील गणपतीबरोबरच राजेशाही मुकुट, आकर्षक आसन, कमळावर विराजमान गणपती, बालगणेश अशा विविध संकल्पनांच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.

  • बारकाव्यांवर भर : काही मूर्तींमध्ये मुकुट, दागिने, आसन आणि हातातील आयुधांच्या रचनेत बारकावे साधण्यावर भर देण्यात आला आहे.

  • सजावटीचे बदलते ट्रेंड्स : सोशल मीडिया आणि सजावटीच्या बदलत्या ट्रेंड्सचाही मूर्तींच्या मागणीवर परिणाम होत असल्याचे दिसते. घरातील सजावटीच्या थीमनुसार मूर्ती निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. पारंपरिक घरगुती सजावटीसोबतच साध्या स्वरूपातील मूर्तींना पसंती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news