नवे ओबीसी आम्हाला अमान्य : छगन भुजबळ | पुढारी

नवे ओबीसी आम्हाला अमान्य : छगन भुजबळ

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे समिती महाराष्ट्रात फिरून जे नवे कुणबी तयार करत आहेत, ती प्रक्रिया आम्हाला पूर्णत: अमान्य आहे. ओबीसींना नेस्तनाबूत करण्याचा हा डाव आहे. तो आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी येथील मेळाव्यात दिले.

ओबीसीत आताच 356 जाती आहेत. त्यात आता नवे कुणबी येऊ पाहात आहेत. खोटे दाखले दिले जात आहेत. आम्हाला बेकायदा गावबंदी केली जाते. हे खपवून घेणार नाही. ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला’ असे लोक आम्हाला आव्हान देतात. ही दादागिरी खपवून घेणार नाही. मराठ्यांना वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून हजारो कोटी देतात आणि आता आमचे आरक्षण काढून घेता. ही मुजोरी आम्ही का सहन करावी? गावबंदी करणार्‍यांना आम्ही शिक्षा करू. खोटे दाखले देणार्‍यांना त्यांची जागा दाखवू, असे सांगत भुजबळ यांनी जरांगेंवर टीकास्त्र सोडले.

Back to top button