Thane News : राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये चाचण्यांचा अभाव | पुढारी

Thane News : राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये चाचण्यांचा अभाव

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुणालय आणि नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवानंतर संपूर्ण राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी रुग्णालयांमधील हे भयावह वास्तव या दोन घटनांमुळे समोर आले असले तरी राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये आजही आजारांच्या निदानासाठी लागणाऱ्या चाचण्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने या चाचण्यांसाठी लागणार खर्चाचा भर रुग्णांवरच पडत असल्याचे उघड झाले आहे.

सरकारी रुग्णालयात माफक दरात किंवा मोफत उपचार होत असल्याने या ठिकाणी गोरगरीब जनता उपचार घेण्यासाठी जाते. मात्र एकीकडे माफक दरात उपचार होत असताना दसरीकडे जर चाचण्यांसाठी सणांच्या नातेवाईकांना बाहेरच्या लॅबमध्ये या चाचण्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागत असतील तर सरकार रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ फायदा काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. औषधे देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचा आजार आहे याची निदाननिश्चिती करावी लागते

राज्यातील अनेक वैद्यकीय महाविद्यालायसह सरकारी रुग्णालायमध्येही यातील अनेक वैद्यकीय चाचण्यांची उपलब्धता नाही. त्यामुळे या चाचण्या बाहेरील लॅबमधून करून घ्याव्या लागतात. त्यासाठी ग्णांना हजारो रुपयांचा भुर्दड पडतो. हातावर पोट असलेल्या अनेक रुग्णांकडे वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसतात, त्यामुळे त्यांना सार्वजनिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी यावे लागते. मात्र तिथे आल्यानंतरही आजाराच्या निदान वाचण्या खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागत असतील तर या रुग्णसेवेचा गरजू रुग्णांना लाभ काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या काळामध्ये निदान निश्चितीसाठी जिल्हानिहाय प्रयोगशाळा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र त्यावर प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. या प्रयोगशाळांची प्रतीक्षा आजही कायम आहे. सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये रोज १५ हजार वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. साथीच्या आजारांचा जोर वाढता असला की या चाचण्यांची संख्या वाढते. या चाचण्यांसाठी लागणाऱ्या रिएजन्टची उपलब्धता ही हाफकीन बायोफार्माकडून केली जात होती. तीन वर्षांपासून ती थांबली आहे. त्यामुळे राज्यातील इतर सणालायंमध्येही लिपिड प्रोफाइल, हार्मोनल चाचण्या, थायरॉइड, लिपिड चाचण्या, इलेक्ट्रोलाइट बिलरुबीनसारख्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी खासगी लंबवर अवलंबून राहावे लागते. सार्वजनिक रुग्णालायमध्ये मोफत वैद्यकीय सेवा मिळणे हा रुग्णहक असताना चाचण्यांसाठी रुग्णांनी पैसे का मोजायचे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

मधुमेहासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांचा मासिक खर्च हा दहा लाख रुपयांच्या घरात आहे. याशिवाय विविध आजारांचे निदान करणाऱ्या अशा काही चाचण्या आहेत ज्यांचा खर्च हा हजारो रुपयांच्या घरात आहेत. या चाचण्या सरकारी रुग्णालयात का उपलब्ध करून देण्यात येत नाही मोठा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये सरकारी रुणालये आणि खाजगी लॅबचे साटेलोटे असल्याचीहे अनेक उदाहरणे समोर आली आहे.

Back to top button