Thane News : मराठी माणसांवर टिप्पणी, परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप | पुढारी

Thane News : मराठी माणसांवर टिप्पणी, परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याणच्या रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका परप्रांतीय फेरीवाल्याकडून सामान विकत घेत असताना त्या फेरीवाल्याने ‘मराठी ग्राहकाला तुम्ही मराठी लोक असेच असतात. अशा उपरोधिक शब्दांत मराठी भाषेला डिवचले. यावर तु मला बोल पण, माझ्या मराठी भाषेला काही बोलू नकोस, असे ग्राहक तरुणाने फेरीवाल्याला बजावले. या घटनेनंतर झालेल्या वादविवादादरम्यान घटनास्थळी राजसैनिक दाखल झाले. मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या या उन्मत्त परप्रांतीय फेरीवाल्यांची राजसैनिकांनी यथेच्छ धुलाई करत धिंड काढली. हा सारा प्रकार रविवारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील स्कायवॉकवर घडला. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समस्त मराठी भाषिक तथा मराठीप्रेमी कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

यासंदर्भात मिळालेली माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील वासिद भागात राहणारा एक मराठी भाषिक तरुण कामानिमित्त कल्याणमध्ये आला होता. काम आटोपल्यानंतर तो कल्याण रेल्वे स्थानकातून आसनगाव लोकलने घरी चालला होता. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर एका फेरीवाल्याकडून या तरुणाने पैसे देऊन काही सामान खरेदी केले. त्यातील वस्तू खराब  वाटल्याने तरुणाने तो परत करुन फेरीवाल्याकडून पैसे मागितले.. मात्र फेरीवाल्याने पैसे देण्यास इन्कार केला. वस्तू खराब आहे म्हणून ती परत केली. तू माझे पैसे परत कर, असा या तरुणाने तगादा लावला यावर परप्रांतीय फेरीवाल्याने तरुणाला उद्देशून मराठी लोक असेच असतात, अशा उपरोधिक शब्दांत टिका-टिपण्णी केली. तुम्ही मराठीचा उल्लेख येथे कशासाठी करता ? तु मला बोल, पण मराठीचा अवमान करू नकोस, अशा शब्दांत तरुणाने झाडले. हे पाहन अन्य परप्रांतीय फेरीवाले या तरुणाभोवती जमा होऊन हुल्लडबाजी करू लागले.

मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या त्या फेरीवाल्याचा खरेदीदार तरुणाला राग आला. इतर फेरीवाले तरुणाशी वाद घालत असताना तरुणाने मी मनसैनिकांना बोलवतो, असा इशारा दिला. त्यावेळी तु कुणालाही बोलव जा, ते आमचे काही वाकडे करू शकत नाहीत, असा उर्मट उलट इशारा फेरीवाल्याने दिला. तरुणाने कल्याण पूर्वेतील मनसेच्या शाखेत जाऊन पडलेला प्रकार उपस्थित राजसैनिकांना सांगितला. शाखेतील चार ते पाच राजसैनिक तात्काळ रेल्वे स्कायवॉकवर पोहोचले. हज्जत घालणान्या फेरीवाल्यासह येथे मयुरी करणाऱ्या अन्य फेरीवाल्यांना येथे येऊन एंदा करता आणि उलट आम्हालाच शिकवता, असे बोलत मराठी भाषेचा अवमान करणान्या फेरीवाल्यांना यथेच्छ बदडून काढले. राजसैनिकांचा रुद्रावतार पाहून स्कायवॉकवरील इतर फेरीवाल्यांनी तेथून पळ काढला. काही वेळाने रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आले. राजसैनिकांनी फेरीवाल्यांना पकडून जवानांच्या ताब्यात दिले. या प्रकारामुळे स्कायवॉकवर काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.

Back to top button