file photo
ठाणे
Thane News : उल्हासनगरमधील कंपनीत भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 5 जखमी
उल्हासनगर : उल्हासनगर येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट झाला. या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. सहा कामगार जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
शैलेश यादव आणि राजेश श्रीवास्तव अशी मृतांची नावे आहेत. सागर झाल्टे, पंडित मोरे, प्रकाश निकम, हंसराज सरोज, अमित भरनुके, मोहम्मद अरमान हे कामगार गंभीर जखमी आहेत. या संदर्भात सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी कंपनीत बाहेरुन टँकर आला होता. त्यात कार्बन डाय सल्फर हे रसायन भरण्यात येणार होते. मात्र टँकरची तपासणी सुरू असतांनाच विस्फोट झाला.

