ठाणे: अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील रेल्वे रुळ खचला; वाहतूक बंद | पुढारी

ठाणे: अंबरनाथ - बदलापूर मार्गावरील रेल्वे रुळ खचला; वाहतूक बंद

बदलापूर: पुढारी वृत्तसेवा : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत दरम्यानची वाहतूक सकाळपासून बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाखालील नाल्याच्या आजूबाजूला असलेली खडी वाहून गेल्यामुळे या ठिकाणी रेल्वे रुळ खचले आहेत. त्यामुळे बदलापूरहुन मुंबईकडे आणि मुंबईहून बदलापूरकडे येणाऱ्या सर्व लोकल गाड्या मध्य रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून याच ठिकाणी रेल्वे रूळांखालील खडी वाहून तसेच पाणी भरते. मात्र, अंबरनाथ नगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने त्याचा फटका बदलापूर ते कर्जत खोपोली तसेच पुणे आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीला बसत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने यात कोणतेही सुधारणा न केल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक फटका सहन करावा लागला. अनेक रेल्वे प्रवासी हे सकाळी मुंबईच्या दिशेने गेले आहेत. त्यांना संध्याकाळी येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच बदलापूरवरून अंबरनाथकडे खासगी वाहन, रिक्षा यांनी प्रवाशांची लूट सुरू केल्यामुळे प्रवासी वर्गांतून संताप व्यक्त केला जात आहेत.

हेही वाचा 

Back to top button