Mira Road Crime : सरस्वतीच्या शरीराचे ३५ तुकडे मिळाले

Mira Road Crime : सरस्वतीच्या शरीराचे ३५ तुकडे मिळाले
Published on
Updated on

ठाणे :  मीरा भाईंदरमधील सरस्वती वैद्यच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांना ३६ वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे ३५ तुकडे सापडले आहेत. या तुकड्यांचा डीएनए सरस्वती वैद्य यांच्या बहिणींशीही जुळला आहे. पोलिसांना सापडलेले काही तुकडेही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले होते. (Mira Road Crime)

ठाण्यातील मिरा-भाईंदर येथे लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या करत तिच्या शरीराचे असंख्य तुकडे केले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. इमारतीत मिळालेल्या सरस्वती वैद्य या तरुणीच्या शरीराच्या तुकड्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. फॉरेन्सिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही. मात्र, तरुणीच्या शरीराचे ३५ तुकडे मिळाल्याची माहिती आहे. शरीराचा नेमका कोणता भाग गायब आहे, यासंबंधी अहवाल येणे अद्याप बाकी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या तुकड्यांचा डीएनए सरस्वती वैद्यच्या बहिणींशी जुळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही तुकडे हे कुकरमध्ये शिजवलेले होते. तर काही तुकडे तळलेले होते. आरोपी मनोज साने याने ३ जून रोजी रात्री १० ते १२ च्या दरम्यान सरस्वती वैद्यची हत्या केली. आरोपीने खुनाच्या काही महिन्यांपूर्वी मार्बल कटर मशीन खरेदी केले होते आणि त्यानंतर ४ जून रोजी ट्री कटर मशीन देखील खरेदी केली होती

आरोपी सेक्स अॅडिक्ट

मनोज साने याच्या मोबाईलवरून मिळालेल्या पुराव्यावरून तो सेक्स अक्ट असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी मनोज आणि सरस्वती यांनी काही वर्षांपूर्वी तुंगारेश्वर मंदिरात लग्न केले होते आणि त्यानंतर ते मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. मात्र, त्यानंतर आरोपीच्या इतर संबंधांमुळे त्याचे आणि सरस्वतीचे कायम भांडण होत होते. त्यामुळेच त्याने सरस्वतीची हत्या केली असावी, असे तपासातून समोर येत आहे. (Mira Road Crime)

विकृतीची परिसीमा

फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिल्याने हा गुन्हा उघडकीस आला… पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, आरोपी मनोज सानेने करवतीने शरीराचे तुकडे कापून कुकर आणि भांड्यात उकळलेच नाही तर ते तळून बादल्या आणि टबमध्ये ठेवले. वैद्य यांचा मृत्यू ३ जून रोजी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र ही बाब ७ जून रोजी उघडकीस आली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत आरोपी मनोज सानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mira Road Crime)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news