‘यह मेरा एरिया है…’ म्हणत कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाने अडवली रेल्वे | पुढारी

'यह मेरा एरिया है...' म्हणत कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाने अडवली रेल्वे

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा :  कल्याणमध्ये अंगावर रोमांच उभा करणारी घटना मंगळवारी भल्या सकाळी घडली. एखादा मध्यपी नशेचा अंमल चढल्यावर कधी काय करेल त्याचा नेम नसतो. नशेत धुंद होत या व्यक्ती काय वागतात, काय बोलतात याची त्यांना कसलीही कल्पना नसते. कल्याण रेल्वे स्थानकात तर एक भयंकर प्रकार शेकडो प्रवाशांनी याची देही याची डोळा पाहिला. एका मद्यधुंद तरुणाने थेट रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर तो रेल्वे रुळांवर जाऊन बैठक मांडली. हा तरूण रेल्वे रुळांवर बसलेला पाहून उपस्थित हा प्रकार पाहणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या उरात धडकी भरली होती.

सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एकहून सीएसटीएमच्या दिशेने लोकल निघाली. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर रेल्वे रुळावर एक तरुण ठाण मांडून बसल्याचे ही लोकल चालविणाऱ्या मोटरमनच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत मोटरमनने लोकल थांबवून आरपीएफला पाचारण केले. आरपीएफने या तरुणाला ताब्यात घेतले. मद्यपान केलेला हा तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे रुळावर बसला असल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीनी वर्तविली. मोटरमनने या तरूणाचा जीव वाचवला. प्रवाशांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगून मोटरमनने पुढचा प्रवास सुरू केला. या तरुणाने नशा करून हे कृत्य केले असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

मी कुठेही बसू शकतो ?

ये एरिया मेरा है मैं यहा रेहता हू काही भी बैठ सकती है, असे सांगत हू तरुणाने थेट रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडत समोरून येणारी लोकल रोखली. मोटरमनने खाली उतरून या तरुणाला कोण आहेस ? इथे का बसलास ? असे विचारले असता तरुणाने मी इथे राहतो, हा माझा एरिया आहे. मी कुठेही बसू शकतो, असे सांगितले.

Back to top button