कल्याण पूर्वेत आमदार केसरी बैलगाडा शर्यतीमधून गदा पळवली | पुढारी

कल्याण पूर्वेत आमदार केसरी बैलगाडा शर्यतीमधून गदा पळवली

ठाणे : शुभम साळुंके : कल्याण पूर्वेतील खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावाने आमदार केसरी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा पळवण्यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. या नंतर आयोजकांनी चोरलेल्या गदा परत करण्याचे आवाहन केले होते. मात्र चोरटयांनी चोरलेल्या गदा परत न केल्याने आयोजकांनी आवाहन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पावसाळ्याआधी बैलगाडा शर्यतींचा अंतिम टप्पा ग्रामीण भागात सुरु आहे. मलंगगड भागातील खरड गावात आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या स्पर्धेत बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेले गदा पळवल्‍याने सध्या आयोजकांनी आवाहन केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बुधवारी मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावात या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. काकडवाल गावातील निलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. सुमारे बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवरून दहा ते बारा गदा पळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

-हेही वाचा 

दै. पुढारी विशेष : राज्यातील आदिवासी खेळाडू ‘वैयक्तिक’ प्रकारात झळकणार

‘ग्रीन टी’ पिताना करू नका ‘या’ चुका

कोल्हापूर : पंचगंगेला पुन्हा जलपर्णीचा धोका

Back to top button