ठाणे: मुरबाड एसटी आगाराला तीन महिन्यात ९४ लाखांचे उत्पन्न | पुढारी

ठाणे: मुरबाड एसटी आगाराला तीन महिन्यात ९४ लाखांचे उत्पन्न

मुरबाड, पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आगार हा उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर डेपो म्हणून ओळखला जातो. मार्च, एप्रिल, मे या कालाववधीत ४ लाख ५९ हजार ४५९ महिलांनी एसटीतून प्रवास केला. आगाराला ९४ लाख १२ हजार ४५९ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आगार प्रमुख योगेश मुसले यांनी दिली.

शासनाने महिला प्रवाशांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सूट दिली आहे. सध्या मुरबाड ग्रामीण भागातून तसेच शहरी भागातून मुरबाड- कल्याण, मुरबाड- कल्याण तसेच मुरबाड ग्रामीण भागात असणाऱ्या ५० मार्गावर एसटी धावत आहे. एसटी प्रवासाला महिला वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

                        महिला प्रवासी संख्या                     उत्पन्न
मार्च                        ७४,९७६                              १४, २०,९३४

एप्रिल                     २,३०, ७२१                             ४४, ८२, २९५

मे                           १,५३, ८५२                            ३५,०९, २३०

तिकीट दरातील ५० टक्के सवलतीला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत ४ लाख ५९ हजार ४५९ महिलांनी सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामुळे मुरबाड आगाराला ९४ लाख१२ हजार ४५९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
– योगेश मुसले, एसटी आगार प्रमुख, मुरबाड

हेही वाचा 

Back to top button