ठाणे: नौपाडा येथे स्लॅब कोसळून तीन जण जखमी | पुढारी

ठाणे: नौपाडा येथे स्लॅब कोसळून तीन जण जखमी

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळल्याची घटना आज (दि. १५) सकाळी घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाब कार्य राबवण्यात येत असून इमारतील रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येऊन इमारत रिकामी करण्यात आली आहे.

नौपड्यातील भास्कर कॉलनी, येथील अमर टॉवर या सात मजली इमारतीचे २५ वर्षे जुने बांधकाम आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. १०१ चा स्लॅब आज सकाळी ११ च्या सुमारास अचानक कोसळला. यावेळी एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती दुर्घटनास्थळी अडकल्या होत्या. घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

घटनास्थळी अडकलेल्या पाचही जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील प्रथमेश सूर्यवंशी (वय 28), विजया सूर्यवंशी (वय 54), अथर्व सूर्यवंशी (वय14) असे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा 

Back to top button