सह्याद्रीत घुमली वाघाची डरकाळी; राज्यात वाघांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली | पुढारी

सह्याद्रीत घुमली वाघाची डरकाळी; राज्यात वाघांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात गेल्या चार वर्षांत वाघांच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ झाली आहे. सह्याद्रीमध्ये दोन वाघांची डरकाळी घुमली. त्यामुळे सह्याद्रीपट्ट्यात पटेरी वाघांची संख्या वाढल्याने प्राणीप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी सह्याद्री पट्ट्यात चार पटेरी वाघ आढळून आले आहेत. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. नुकत्याच झालेल्या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला आहे. त्यामुळे आता राज्यात सुमारे ४०० हून अधिक वाघ आहेत.

११ हजार चौरस किलोमीटरच्या वर विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची शानच. या व्याघ्र प्रकल्पात तिथल्या घनदाट जंगलांमध्ये आणि वनराईमध्ये वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागली आहे. धरणाच्या परिसरामध्ये दोनदा वाघ दिसला आहे. बिबट्यांसह अन्य पशुपक्षी साडे तिनशेच्या आसपास संख्या आढळून आली आहे. १,१६५.५६ चौरस किलोमीटर वसलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश होतो. कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान याचा समावेश या व्याघ्र प्रकल्पात आहे.

बौध्द पौर्णिमेच्या शितल चादंण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केलेल्या पशुपक्षी गणनेत ४ बिबट्यांचे दर्शन घडले. त्याच बरोबर सर्वाधिक ८२ चितळांचे, माकडांचे, वानर या प्राण्याबरोबरच वटवाघुळ, घुबड, मोर यासारखे पक्षीही दिसून आले. वन्यजीवांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रात तसेच अभयारण्यात दरवर्षी बौध्द पौर्णिमेच्या स्वच्छ प्रकाशात पशुपक्षीगणना करण्याचे आयोजन वन्यजीव विभागाच्या वतीने केली जाते. कोर- नाच्या काळात दोन वर्षे ही गणना झाली होती. गेल्या वर्षी ही गणना झाली होती. त्यात चारच बिबटे आढळले होते. चितळ्यांच्या संख्येत यंदा वाढ झालेली दिसून येते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या बोरिवलीतील कृष्णगिरी उपवन, तुळशी, येऊर आणि तुंगारेश्वर या वनपरिक्षेत्रात बौध्द पौर्णिमेच्या चांदण्यात पशुपक्षी गणना करण्यात आली. या वनपरिक्षेत्रात येऊर मध्ये १२, कृष्णगिरी उपवन १, तुळशी ७ आणि तुंगारेश्वरमध्ये ११ पाणवठे आहेत. कृष्णगिरी, तुळशी, येऊर, तुंगारेश्वर अभयारण्यात बिबट्या ४, रानमांजर २, ठिपक्यांचे हरीण (चितळ) ८२, सांबर २४, लंगूर ४२, माकड ४४, घुबड २४, मोर ११ बदक आणि पाण्यातले पक्षी १६, मुंगूस १, अन्य पक्षी ११९ असे प्राणी-पक्षी आढळून आले आहेत.

कोयना वन्यजीव अभयारण्यात पुरेशा तृणभक्षक प्राण्यांचा अभाव आणि अन्य कारणांमुळे या व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थायिक होऊन पिल्लांना जन्म देणारे वाघ नाहीत. त्यामुळे वाघ पहिल्याच्या दाव्याला पुष्टी मिळाली तर ही फार मोठी बाब ठरेल. मे २००८ मध्ये पहिल्यांदा चांदोली राष्ट्रीय उद्यानात लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये वाघाचा फोटो आढळला होता. यावर्षी राधानगरी वन्यजीव अभयारण्य मध्ये सुद्धा असाच एक वाघ कॅमेरा ट्रॅप मध्ये आढळला होता. पण अद्याप पर्यंत डोंगराळ भाग, कडेकपाऱ्या आणि प्राण्यांचे पुरेसे अस्तित्व नसलेल्या कोयनेमध्ये वाघाचे अस्तित्व अलीकडच्या काळात तरी आढळले नव्हते. २००४ च्या व्याघ्र गणनेत सह्याद्रीमध्ये साधारणपणे पाच ते आठ वाघांचे अस्तित्व आढळून आले होते. पण हे वाघ सह्याद्रीमध्ये राहून पिल्लांना जन्म देत नाहीत अगदी काही काळासाठी येतात आणि जातात.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये होत असलेल्या बॉक्साईट उत्खननामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याच्या दक्षिणेतील वाघांचे अधिवास जसे की कर्नाटकातील काली व्याघ्रप्रकल्प यांच्यातला दुवा तुटला आहे किंवा विखंडित झाला आहे. त्यामुळे दक्षिणेतून वाघ या व्याघ्र प्रकल्पात येत नाहीत. सिंधुदुर्गातल्या तिल्लारी भागांमध्ये प्रजनन करणाऱ्या वाघांची नोंद झाल्यामुळे तो भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला जोडला जावा अशी प्रशासनाची इच्छा आहे. या अधिवासाचा विकास केल्यास तिथे वाघ सह्याद्रीमध्ये येऊन संख्या निश्चितच वाढेल. दरम्यान बोर, उमरेड आणि नागझिरा अभयारण्यात प्राणी गणना रद्द करण्यात आली. तर येऊर, कर्नाळा, तुंगारेश्वर अभयारण्यातही ढगाळ वातावरणात प्राणी गणना करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फलाय कॅचर, भोरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी आढळतात.

कर्नाळा अभयारण्यात रानडुक्कर तसेच माकडेच मोठ्या प्रमाणावर आढळले. तर तुंगारेश्वर अभयारण्यात बिबट्यांचे दर्शन झाले नाही. मात्र अन्य पक्षी, प्राणी यांचे आवाज ऐकू आले तर काहींचे दर्शनही झाले. मात्र एकंदरीतच अवकाळी ढगाळ वातावरणामुळे प्राणी गणनेत व्यत्यय आला होता. महाराष्ट्रासह देशभरातील अभयारण्यांमधील प्राण्यांची संख्या कमी होत आहे. राज्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढलेली असली तरी इतर प्राण्यांची संख्या कमी झाली आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात प्राणी गणनेत यंदा बिबट्याचे दर्शन झाले नाही. मात्र प्रत्यक्ष दर्शन आणि आवाजावरून विविध पक्षी रान डुक्कर, ससे, सांबर, हरणांचा वावर दिसून आला.

तुंगारेश्वर अभयारण्याचा विस्तार हा एकूण आठ हजार पाचशे सत्तर हेक्टर क्षेत्रात आहे. पारोळ, सातिवली, मांडवी, रेन्जऑफिस पर्यंत पसरलेल्या असुन या जागेत विविध पक्षी प्राणी वावरत असतात. येथे भरपूर प्रमाणात असलेल्या सश्यांबरोबर हरणांची व रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. या भागात कोरोनाच्या आगोदर प्राणिगणना करण्यात आली होती. यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला होता. कोल्हा, घोरपड, साप, लांडगे घुबड, घार, तुतारी, कुहुवा, पहाडी अंगारक, शिपाई बुलबुल, कवडे, महाभृंगराज, सुतार, मोर कोकीळ, मैना यासह विविध पक्षी प्राणी अभयारण्यात असल्याचे यंदा समजून आले आहे.

Back to top button