ठाणे : डिव्हायडरला आदळून रिक्षाला आग; महिला प्रवाशाचा आगीत होरपळून मृत्यू | पुढारी

ठाणे : डिव्हायडरला आदळून रिक्षाला आग; महिला प्रवाशाचा आगीत होरपळून मृत्यू

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख पोलीस चौकी जवळ रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या मधील बाजूस असलेल्या रोड डिव्हायडरवर रिक्षा आदळून अपघात झाला. यावेळी रिक्षास आग लागली. यावेळी आग लागलेल्या रिक्षात अडकल्याने महिला प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली.

अपघातग्रस्त झालेल्या रिक्षातून चालकासह एक महिला प्रवासी गायमुख ते घोडबंदर रोड असा प्रवास करीत होते. त्याच वेळी रिक्षा चालक राजेश कुमार यादव (वय ४५ वर्षे., राहणार – लोकमान्यनगर, पाडा नंबर-४, ठाणे) याचा वाहनवरील ताबा सुटला व रिक्षा रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. या अपघातामुळे अपघातग्रस्त रिक्षात अचानक आग लागली.

यावेळी महिला आग लागलेल्या रिक्षातच अडकल्याने त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

Back to top button