भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ८ वर पोहचली; तब्बल ४२ तास बचावकार्य सुरू | पुढारी

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ८ वर पोहचली; तब्बल ४२ तास बचावकार्य सुरू

भिवंडी : पुढारी वृत्‍तसेवा भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळ पाडा येथे शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वर्धमान ही तळ अधिक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या दुर्घटने नंतर ढिगाऱ्याखाली मोठ्या संख्येने नागरीक अडकल्याची भीतीने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर टी डी आर एफ व एन डी आर एफचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य सुरू करीत दहा जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवले,

दरम्‍यान आठ जणांचे मृतदेह ढिगाऱ्या खालून अखेर बाहेर काढले. येथील बचावकार्य एनडीआरएफ टीडीआरएफ स्थानिक नारपोली पोलिस या सर्व यंत्रणांकडून खात्री करून तहसीलदार अधिक पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकाळी नऊ वाजता थांबविण्यात आले आहे.

या इमारतीचा तळ मजला व पहिल्या माजल्यावर एमआरके फूड या कंपनीने दहा कंटेनर मालाची साठवणूक केली होती. तर टेरेसवर मोबाईल टॉवर उभारल्याने वजनाचा भार सहन न झाल्याने ही इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्‍याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा :  

Back to top button