ठाणे जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक | पुढारी

ठाणे जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  राज्य निवडणूक आयोगाने ठाणे जिल्ह्यातील पिंपळास, वळ, दापोडे व नेवाळी ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार असून १८ एप्रिलपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक काळात वरील ग्रामपंचायत हद्दीत तसेच निवडणूक प्रक्रिया होणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविली आहे.

ग्रामपंचायत पोटनिवडणूक काळात शांतता व सुव्यवस्था राखली जावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील निवडणूक क्षेत्रात शस्त्र परवानाधारकांना शस्त्र ताब्यात ठेवण्या व बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ २ भिवंडी अंतर्गत कोनगाव पो.स्टे. हद्दीत पिंपळास व नारपोली पो.स्टे. हद्दीत वळ व दापोडे तसेच परिमंडळ ४ उल्हासनगर अंतर्गत हिललाईन पो.स्टे. हद्दीत नेवाळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तसेच भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांची तहसिल कार्यालय निवडणूकीचे स्ट्रॉगरूम व निवडणुकीशी संबंधीत इतर कार्यालये या ठिकाणी १८ एप्रिल ते २४ मे पर्यंत अंमलात राहील, असे डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

Back to top button