ठाणे : ‘मविआ’चा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा: आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड सहभागी | पुढारी

ठाणे : 'मविआ'चा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा: आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड सहभागी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : पोस्ट व्हायरल केली म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्ती रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी आज (दि. ५) महाविकास आघाडीच्या वतीने पोलिस आयुक्त कार्यालयावर टाळे लावा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून मोर्चाला सुरूवात झाली. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चिंतामणी चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

ठाण्यात वारंवार ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून त्यांच्यावर खोटेही गुन्हे दाखल केले जात आहेत. आता  युवती सेनेच्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. तसेच पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असता ते कार्यालयात नव्हते. यातून सरकार खरच नपुंसक असल्याचे पोलीस आयुक्तांनी दाखवून दिल्याचा आरोप करीत  ठाणे पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकण्यासाठी आज महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी नेते सहभागी झाले आहेत. याच महिलांची संख्याही मोठी आहे.

हेही वाचा 

Back to top button