डोंबिवलीत ठाकरे गटाचे बॅनर अज्ञातांनी फाडले | पुढारी

डोंबिवलीत ठाकरे गटाचे बॅनर अज्ञातांनी फाडले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्यावतीने डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडवा निमित्त लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

डोंबिवली पूर्वेकडे ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. शनिवारी रात्री सुमारास काही अज्ञात इसामांनी हे बॅनर फाडले. आज (दि.२६) सकाळी बॅनर फाडल्याचे लक्षात येताच विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button