डोंबिवली: केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन | पुढारी

डोंबिवली: केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून दिल्लीत ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात येत आहे. याच सत्याग्रह आंदोलनाचे पडसाद महारष्ट्र दिसून येत असून डोंबिवली पश्चिम येथील गांधी उद्यानात काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधीजी यांचे ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार होते. पण मानहानीच्या एका खटल्यात सुरत येथील न्यायालयाने त्यांना 2 दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ‘मोदी आडनाव’बाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबाबत हा निर्णय देण्यात दिला होता. न्यायालयाचा निर्णय येताच दुस-या दिवशी राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी याबाबतचा निर्णय जाहीर केला. मात्र, सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता. त्याआधीच लोकसभेतील त्यांचे खासदारकीचे पद रद्द केल्याने काँग्रेस पक्षातर्फे सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराषट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार डोंबिवली पश्चिम येथील गांधी उद्यानात डोंबिवली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, डोंबिवली पूर्व विभाग अध्यक्ष अजय पॉल, सेवादल जिल्हा अध्यक्ष लालचंद तिवारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि नागरी विकास विभाग सेवादल डोंबिवली शहर अध्यक्ष समशेर खान, माजी नगरसेवक नवीन सिंग, सरचिटणीस बेबी परब, सुषमा कांबळे, सर्जेराव पडले, अनिल बनसोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सत्याग्रहात सहभागी झाले होते.

हेही वाचा

Back to top button