कोकणात पाणीप्रश्न पेटणार | पुढारी

कोकणात पाणीप्रश्न पेटणार

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कोकणात फेब्रुवारीपासूनच काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून गेली 20 वर्षे कोकणातील 77 धरणे प्रलंबित असताना कोकणातील धरणांना पैसे न देता 15 हजार 66 कोटी हे कोकणातून इतर भागात पाणी नेण्यासाठी देण्यात आल्याने कोकणातील चाकरमान्यांच्या फोरमने याविरोधात संघटित होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारीही सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोचरे बु. सडेवाडी येथे 6 मार्चपासून टँकर सुरू झाला आहे. पालघर जिल्ह्यातही 69 गावांत टंचाई सुरू झाली असून रत्नागिरी, सिंध्ाुदुर्गातही टंचाईचे चटके बसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील धनगरवाड्यांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभ्ाूमीवर पाटबंधारे प्रकल्पांना त्वरीत निधी दया अशी मागणी जोर धरू लागली आहे. रायगड जिल्ह्यात 321 तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीत 200 गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. त्यामुळे फोरमने अपूर्ण धरणे पूर्ण करण्यासाठी निधी देऊन कोकणचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकूणच कोकणचा पाणी प्रश्न पेटणार आहे.

कोकणात 90 पैकी 77 प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. मध्यम प्रकल्पांतर्गत गडनदी, अर्जुना, नारडवे, हेटवणे, जामदा, देहेरजा, देवघर, अरुणा, कोर्ले सातंडी, सरंबळा, सांबरकुंड हे मध्यम प्रकल्प असून त्यातील एकही प्रकल्प पूर्णावस्थेत गेलेला नाही,तर पाटबंधारे महामंडळाचे अपूर्ण राहिलेल्या लघुप्रकल्पांमध्ये शिवडाव, मोरवणे, शिळ, वैतरणेश्वर, वावीहर्ष, दाभाचीवाडी, तुळ्याचा पाडा, पन्हाळघर, तांगर, कोंडीवली, साखरपा, शिरसाडी, रोशनी, भोलवली, वाघ, आवशी, रांगाव, शिरमंत, पाली-पुतवली, पिंपळवाडी, आंबई, काचुर्ली, पवाळे, शिराळे, नामपाडा, बिरवाडी, तालेरे, चिंचवाडी, तळवडे, पन्हाळे, वडशेतवावे, देंदोनवाडी, ओटाव, कळवली-धारवली, तरंदळे, शेलारवाडी, गरगाई, डोमीहिरा, निरूखे,

Back to top button