Maharashtra Budget : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पात ५० टक्क्यांची तरतुद! | पुढारी

Maharashtra Budget : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पात ५० टक्क्यांची तरतुद!

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा :  तब्बल ७० वर्षांपासून रखडलेल्या कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा देण्याचे आजच्या अर्थसंकल्पात जाहीर केले. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के वाटा देण्याचे जाहीर केले. मुरबाडसाठी आजचा दिवस हा सुवर्णदिन ठरला आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले आहेत.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के खर्च उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावेळी त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, अडीच वर्षांत निर्णय घेतला गेला नव्हता. या संदर्भात राज्यात भाजपा-शिवसेनेची पुन्हा सत्ता स्थापन झाल्यावर, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री . कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५० टक्के खर्चाला हमी देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आजच्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये मुरबाड-कल्याण -मुरबाड रेल्वेसाठी राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पात ५० टक्के ची तरतुद!

हेही वाचा

Back to top button