ठाणे : दिव्यांग सेजलची ऑलिम्पिकमध्ये निवड | पुढारी

ठाणे : दिव्यांग सेजलची ऑलिम्पिकमध्ये निवड

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : शारीरिक व्यंगापेक्षा ध्येय मोठे असते असे दाखवून देत अनेक स्पर्धामध्ये भाग घेत सेजल जयस्वाल हिने शाळेचे नाव उंचावले आहे. दिव्यात राहणारी सेजल क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत शिकते. आतापर्यंत तिने अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगली कामगिरी केली आहे. तिच्या या ध्येयवादी स्वभावामुळे जर्मनी येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्‍पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

सेजल जयस्वाल ही दिव्यातीलच एका शाळेत शिकत होती. मात्र सेजल ही बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असल्याचे लक्षात आल्याने क्षितीज या गतीमंद शाळेत तिला घालण्यात आले. त्यानंतर तिची बौद्धिक क्षमता पाहून क्षितिज शाळेने तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. सातत्याने तिच्याकडून धावणे, उंच उडी, फुटबॉल या खेळांचा सराव करुन घेतला. इतकेच नव्हे तर विशेष मुलांच्या ऑलिम्पिकसाठी तिचा अर्ज भरला.

विविध स्तरावर स्पर्धा खेळत सेजलने यश संपादन केले. ठाणे, पुणे, कोल्हापूर , गुजरात, झारखंड अशा विविध ठिकाणी जाऊन ती स्पर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवल्यानंतर तिची ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी दिली. सध्या जर्मनी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ती सराव करत आहे. दरम्यान सेजल हिचे वडील दिव्यात रिक्षा चालक असून आई गृहिणी आहे.

हेही वाचा :  

Back to top button