ठाणे : चित्ररथावर झळकला उल्हासनगरमधील ‘रोबोट’ | पुढारी

ठाणे : चित्ररथावर झळकला उल्हासनगरमधील 'रोबोट'

उल्हासनगर; पुढारी वृत्तसेवा :  मुंबईत २६ जानेवारी रोजी पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या चित्ररथावरील देखाव्यात उल्हासनगरारातील ड्रेनेजची सफाई करणारा रोबोट झळकला आहे. रोबोटमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेल्याने पालिका अधिकाऱ्यांच्या आणि रोबोट देणाऱ्या संस्थांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नागरी विकास संचनालय यांच्याकडून महानगरपालिकेला पत्र मिळाले होते. त्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई येथील शासकीय सोहळ्यात नगरविकास विभागाच्या चित्ररथा वरील देखाव्यामध्ये सादरीकरण करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वापरात असलेल्या बांडीकूट (रोबोट) यंत्राचा समावेश निश्चित करण्यात आला आहे. सदर यंत्र चालकासह उपलब्ध करून द्यावे, असे पत्रात कळवले होते. त्यानुसार उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजेश वानखेडे यांनी पाठवलेल्या रोबोट शासकीय चित्ररथावर झळकला आहे. उल्हासनगरसाठी ही बाब भूषणावह असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

शहरात साडेतीन ते चार हजाराच्या आसपास

ड्रेनेज असून ते तुंबल्यावर अर्थात चॉकअप झाल्यावर गटारगंगेचे पाणी रोडच्या मधोमध वाहताना दिसत होते. नागरिक आणि वाहने याच गटारगंगेच्या पाण्यातून मार्ग काढत होते. सफाई कामगारांना नेहमीच ड्रेनेज साफ करण्यासाठी कसरत करावी लागत होती. हे चित्र बघून दीड वर्षांपूर्वी रिजन्सी निर्माणचे महेश अग्रवाल, उद्धव रुपचंदानी, अनिल बठीजा आणि टाटा ट्रस्टने उल्हासनगर महागरपालिकेला ड्रेनेज सफाईसाठी दोन रोबोट दिले होते. त्यानंतर टाटाने २१ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एक रोबोट पालिकेला दिला आहे.

नित्याने ड्रेनेजची सफाई

सध्या महानगरपालिकेकडे तीन रोबोट आहेत. हे रोबोटनित्याने ड्रेनेजमध्ये उतरून स्वयंचलित हातांनी ड्रेनेजची सफाई करत आहेत. त्यामुळे | कामगारांवरील ड्रेनेजमध्ये उतरण्याचे संकट टळले आहे.

Back to top button