ठाणे: जितेंद्र आव्हाड यांचा सहायक आयुक्तांवर गंभीर आरोप; ऑडीओ क्लीप व्हायरल | पुढारी

ठाणे: जितेंद्र आव्हाड यांचा सहायक आयुक्तांवर गंभीर आरोप; ऑडीओ क्लीप व्हायरल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : कळवा, मुंब्य्रातील अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याच्या सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना दम भरल्याचा ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारवाई टाळण्यासाठी तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि तुमचे नाव लपवून मला बदनाम करता, असा गंभीर आरोपही त्यांनी केल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे.

सध्या कळवा, खारेगावात २९ बांधकामे सुरु आहेत, या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी केलेला आरोप धक्कादायक मानला जात आहे. कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्याबरोबर फोनवर झालेले संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रोहीदास पाटील यांच्याकडून तुम्ही २० लाख घेतले, असा गंभीर आरोपही त्यांनी यात केल्याचे दिसत आहे. हे चुकीचे आरोप असल्याचे ठाणेकर यांनी केल्याचे दिसत आहे. तर ज्याने पैसे दिले तो माणूस समोर उभा करु का? असा सवालही आव्हाड यांनी केला.

कळवा आणि खारेगावमध्ये टारगेट करता आणि माझे नाव पुढे करता. पण मी कधीच कोणाचे वाईट करायला सांगत नाही. असेही त्यांनी यात स्पष्ट केले आहे. तुम्ही पैसे घेऊन खिशात भरता आणि माझे नाव पुढे करता. इतर इमारती का पाडत नाही? असा सवालही त्यांनी केला. तुम्ही कोणा कोणाकडून पैसे घेता, हे दाखवून देईन, या प्रकरणात उच्च न्यायालयात जाईन, असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.

हेही वाचा :  

Back to top button