नालासोपाऱ्यात एलईडी कारखान्याला भीषण आग | पुढारी

नालासोपाऱ्यात एलईडी कारखान्याला भीषण आग

खानिवडे, पुढारी वृत्तसेवा : नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथे रामा इंडस्ट्रीमधील एलईडी तयार होत असलेल्या कारखान्याला भीषण आग लागली. आज (दि.२५) दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

नालासोपारा पूर्वेच्या वाकणपाडा येथे रामा इंडस्ट्री असून यात अवधूत आश्रम येथे एलईडी तयार करण्याचा कारखाना आहे. आज दुपारच्या सुमारास अचानकपणे या कारखान्यात आग लागल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या आगीची माहिती स्थानिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला दिली.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची तीव्रता अधिक असल्याने आगीचे लोळ उसळत आहेत. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button