ठाणे : साहेब मी गद्दार नाही; कल्याणात ठाकरे गटाचे बॅनर | पुढारी

ठाणे : साहेब मी गद्दार नाही; कल्याणात ठाकरे गटाचे बॅनर

कल्याण; पुढारी वृत्तसेवा :  सोमवारी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना अभिवादन केले जातेय. शिवसेनेत फूट पडून सहा महिने झाले. या गेल्या सहा महिन्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर टोकाची टीका केली जातेय. आज कल्याण शहरात पालिका मुख्यालयासमोर ठाकरे गटाने साहेब आम्ही गद्दार नाही या आशयाचा झळकावलेला बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत होता.

 ठाकरे गट कल्याण शहर शाखेच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरच्या माध्यमातून शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. बॅनर लागल्याचे कळताच महापालिका व पोलिसांनी तत्काळ बॅनर काढण्याची कारवाई केली. या प्रकरणी बॅनर लावणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

साहेब आम्ही गद्दार नाही गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचा समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकाला होईल जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना कल्याण शहर शाखा असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला होता.

Back to top button