राहुल गांधी यांच्यावरील भिवंडी न्यायालयातील दाव्याची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला | पुढारी

राहुल गांधी यांच्यावरील भिवंडी न्यायालयातील दाव्याची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारीला

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील ४ फेब्रुवारीला होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधिकारी राजेश कुंटे यांनी कॉग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटे तर्फे ऍड. गणेश धारगळकर यांनी बाजू मांडली, तर खासदार राहुल गांधी यांची बाजू ऍड. नारायण अय्यर यांनी मांडली आहे. सोमवारी राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधींनी सुनावणीसाठी केलेल्या वैयक्तिक हजेरीतून सूट देण्याच्या अर्जाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र खासदार राहुल गांधी यांनी मागितलेल्या सुनावणीसाठी हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट देण्याच्या मुद्द्यावर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी युक्तिवाद केला जाईल, असे राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.

भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या २०१४ साली लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरए सएसनेच घडवून आणली, असे वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली

Back to top button