देवगिरी एक्स्प्रेसमधील ११ प्रवाशांची हत्यारांचा धाक दाखवून लूट | पुढारी

देवगिरी एक्स्प्रेसमधील ११ प्रवाशांची हत्यारांचा धाक दाखवून लूट

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा  कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान आठ दरोडेखोरांनी देवगिरी एक्सप्रेसमध्ये घुसून ११ एका प्रवाशांना हत्यारांचा धाक दाखवून लुटले. दरोडेखोरांनी काही प्रवाशांना शिवीगाळ करत बेदम झोडपून काढले.

मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला. दरम्यान, या एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या पत्रकाराने दाखवलेल्या सतर्कतेमुळे यापैकी सहा दरोडेखोरांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी कल्याण स्थानकात आवळल्या. यात दोन
अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. १९ ते २६ वयोगटातील हे सर्व दरोडेखोर औरंगाबाद भागातील रहिवासी आहेत.

हेही वाचा :  

Back to top button