पालघरमध्ये इंजेक्‍शन देऊन गुरे पळविण्याचा 'त्‍या' टोळीचा डाव फसला | पुढारी

पालघरमध्ये इंजेक्‍शन देऊन गुरे पळविण्याचा 'त्‍या' टोळीचा डाव फसला

पालघर ; पुढारी वृत्तसेवा पालघर शहर तसेच परिसरात गुरे चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत असून, सोमवारी रात्री 5 गुरे चोरून नेण्याचा टोळीचा डाव फसला. शहरातील आर्यन ग्राऊंडवर ही गुरे आज (मंगळवार) सकाळी बेशुद्ध अवस्थेत सापडली.

पालघरवासीयांकडून या घटनेचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पालघरच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे. मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा आणि गुरे चोरणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी आसिफ बेग यांनी सांगितले.

गुरे चोरण्यासाठी आलेल्या टोळीने गुरांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन त्यांना गाडीत घालून नेण्याचा डाव फसल्‍याने ही घटना समोर आली. दरम्यान, आर्यन ग्राऊंडवर चार गुरे बेशुद्धअवस्थेत असून, आणखी एक जनावर रेल्वे पुलानजीक टाकून दिल्याचे समोर आले आहे. गुरे मालकांचा शोध घेण्यात आला असून, मोकाट गुरे सोडणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button