ठाणे : शिंदे – ठाकरे गटात हाणामारी; पदाधिकारी नियुक्तीवरून वाद | पुढारी

ठाणे : शिंदे - ठाकरे गटात हाणामारी; पदाधिकारी नियुक्तीवरून वाद

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : उड्डाणपुलावरून ठाण्यात राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वाद रंगला असताना आज रात्री 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण तापले आहे. निमित्त होते संजय घाडीगावकर यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती.

संजय घाडीगावकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर कोपरी पाचपाखाडी भागात ठाकरे याना ताकद मिळाली. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून ते किसननगर या ठिकाणी राहात होते. त्याच भागातील संजय घाडीगावकर यांची ठाणे जिल्हा उपप्रमुखपदी नियुक्ती झाली. या शिवसेनेच्या नवीन पदाधिकार्‍याला शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे यांचासह अन्य पदाधिकारी पोहोचले आणि एकच राडा झाला.

बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याला आक्षेप घेतले. माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या कार्यकर्ते आले आणि एकच राडा झाला. उभे असलेल्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या समक्ष ही हाणामारी झाली आणि वातावरण तंग झाले आहे.

Back to top button