ठाणे : सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीसह पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाणे : सुषमा अंधारेंच्या विभक्त पतीसह पदाधिकार्‍यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  शिंदे गटाच्या वतीने ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का देण्यात आला असून ठाण्यातील टेभीनाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे, माजी आमदार योगेश पाटील तसेच ठाकरे गटासह विविध पक्षातील पुणे, लातूर, मुंबई, ठाणे आणि पालघर भागातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.

शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष इरफ़ान शेख यांच्या या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदे गटाने ठाकरे गटाला आणखी धक्का दिला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हे सरकार असल्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया वैजनाथ वाघमारे यांनी दिली. तर सुषमा अंधारे यांना मीच घडवले असल्याचा दावाही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना केला.

या प्रवेशामुळे शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद आणखी वाढलीच असून त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातही या प्रवेशामुळे शिंदे गटाला पाठबळ मिळाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news