ठाणे : भाईंदरमध्ये होणार  मेट्रो कारशेड? | पुढारी

ठाणे : भाईंदरमध्ये होणार  मेट्रो कारशेड?

भाईंदर;  पुढारी वृत्तसेवा :  एमएमआरडीएने भाईंदरमध्ये होणार  मेट्रो  प्रकल्प 7 व 9 चे कारशेड भाईंदर येथील मुर्धा, राई व मोर्वा गावातील ग्रामस्थांच्या जागेत प्रस्तावित केले आहे. त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. या प्रश्नी ग्रामस्थांची समन्वय समितीच्या माध्यमातून 17 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. त्यातील चर्चेअंती कारशेड तेथील शासकीय जमिनीवर उभारण्याबाबतचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 8 दिवसांत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआरडीएला दिल्याचे आ. प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

एमएमआरडीएकडून अंधेरी ते दहिसर व दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या अनुक्रमे भाईंदरमध्ये होणार  मेट्रो   प्रकल्प 7 व 9 चे कारशेड सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामागील मिठागरांच्या जागेत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी एमएमआरडीएने मीठ विभागाकडे जमीन संपादनासाठी कोणताही पाठपुरावा न करता तेथील कारशेड रद्द करुन ती बोस मैदानापुढील राई, मुर्धा, मोर्वा गावातील ग्रामस्थांच्या सुमारे 35 एकर जागेत प्रस्तावित केली. त्याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. त्यावर एमएमआरडीएने ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी अनेकदा बैठका घेतल्या. तसेच कारशेडच्या जमीन संपादनाप्रकरणी हरकती व सूचना मागविल्या. त्यावर ग्रामस्थांनी आ. सरनाईक यांच्या माध्यमातून स्थगिती आदेश मिळविला. सरनाईक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून ग्रामस्थांसोबत चर्चा करण्याची मागणी केली.

त्यानुसार 17 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात बैठक आयोजित करण्यात आली. त्यात ग्रामस्थांच्या वतीने समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी प्रस्तावित करण्यात आलेल्या कारशेडच्या बहुतांशी जागेवर
स्थानिक शेतकरी शेती करीत असून त्या जागेत कारशेड उभारल्यास शेतकर्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सांगितले. तर ग्रामस्थांच्या जमिनींशेजारी अनेक खाजगी जमिनी असताना केवळ शेतकर्‍यांच्या जमिनीवर कारशेड प्रस्तावित केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना
दिले. यावर एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्प 9 चे काम
वेगाने सुरु असून ते पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर कारशेडची जागा मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.

आर्थिक स्त्रोत निर्माण होणार

मेट्रो पुढे उत्तनपर्यंत नेल्यास पर्यटनाच्या द़ृष्टीने त्याचा फायदा तेथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पॅगोडा पर्यंत जाणार्‍या पर्यटकांना होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कारशेडसाठी या परिसरामध्ये महसुल विभागाची शेकडो एकर जमीन असून त्यातील काही जमीन मेट्रो कारशेडसाठीवापरण्यात यावी, तर उर्वरीत जमिनीवर विकास साधल्यास या परिसराचा कायापालट होवून एमएमआरडीएला आर्थिक स्त्रोत निर्माण होणार असल्याचा दावा केला

Back to top button