डोंबिवली : खाणीत पोहण्यासाठी गेलेल्‍या दोन मुलांचा बुडून मृत्यू | पुढारी

डोंबिवली : खाणीत पोहण्यासाठी गेलेल्‍या दोन मुलांचा बुडून मृत्यू

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा- खाणीत पोहण्यासाठी गेलेल्‍या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (दि.९) सकाळी घडली. खाणीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना  आहे. काही दिवसापूर्वी  पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच घरातील पाच जणांचा  खाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

डोंबिवली जवळील भोपर गावातल्‍या गावदेवी मंदिरामागील खाणीत आयरे गावातील सहा मित्र पोहायला गेले होते. खाणीच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. बुडतानाचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खाणीजवळ धाव घेतली. यावेळी चार मित्रांना वाचवण्यात ग्रामस्‍थांना यश आले, मात्र दोन मित्रांचा बुडून  मृत्यू झाला. आयुष केदारे (वय 13), तर दुसऱ्याचे नावही आयुष असल्याची माहिती मिळत आहे.

या खाणीत आधीही काही लोक बुडाल्‍याने स्‍थानिकांच्या मागणीवरून प्रशासनाकडून खाणीजवळ जाऊ नये, असा फलक लावून सुरक्षा रक्षक नेमला होता. मात्र, आता या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्‍याने नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्‍त हाेत आहे.

हेही वाचा :  

Back to top button