ठाणे : आपत्कालीन वाहिकेचे सराव प्रात्यक्षिक, दुर्घटना टाळण्यासाठी कामाचे लक्षवेधी पाऊल | पुढारी

ठाणे : आपत्कालीन वाहिकेचे सराव प्रात्यक्षिक, दुर्घटना टाळण्यासाठी कामाचे लक्षवेधी पाऊल

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण डोंबिवली मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने आपत्कालीन वाहिका नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. ही वाहिका योग्य पद्धतीने काम करते की, नाही हे पाहण्यासाठी कामा संघटना आणि औद्योगिक विभाग यांच्यातर्फे सराव प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र खरी घटना घडेल त्यावेळी या काही त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करू अशी माहिती औद्योगिक सुरक्षा कल्याण सहसंचालक विनायक लोंढे यांनी दिली.

डोंबिवली एमआयडीसी परिसर नेहमीच चर्चेत असतो. या परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने घडत असतात. यापैकीच एक आठवणीत राहणारी दुर्घटना म्हणजे प्रोबेस कंपनीमध्ये झालेला स्फोट. कंपनीत लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला आणि अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर मेट्रोपॉलिटन कंपनीमध्ये देखील अशाच प्रकारची आग लागली होती. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे.

आपत्कालीन वाहिका सुरू केली असून यामध्ये जनरेटर , ऑक्सिजन, फर्स्टएडबॉक्स, स्ट्रेचर्स, मोठेमोठे पाईप, आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा फोम आधी गोष्टींची सुविधा या वाहीकेमध्ये उपलब्ध केली आहे. ही वाहिका नेमकी कशा पद्धतीने कार्यरत आहे. हे पाहण्यासाठी त्यांनी गुरुवारी दुपारी सराव प्रात्यक्षिक केले. यामध्ये वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे निदर्शनास आले. या आधी देखील अनेक वेळा वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा समिती कल्याणचे सहसंचालक विनायक लोंढे यांनी आहे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असून वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत कशी उपलब्ध करता येईल. या संदर्भात कामा संघटनेची चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आल्यामुळे हे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचलंत का?

Back to top button