ठाणे : प्रेम संबंधाला विरोध; आईची मुलाने केली हत्या | पुढारी

ठाणे : प्रेम संबंधाला विरोध; आईची मुलाने केली हत्या

भिवंडी;  पुढारी वृत्तसेवा :  चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विरोध करणे सख्या जन्मदात्या आईच्या जीवावर बेतलं
असून पोटच्या मुलाने चूलत बहिणीच्या मदतीने आईचा पट्ट्याच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे.
कृष्णा अंबिकाप्रसाद यादव(29) व प्रेयसी बबिता पलटुराम यादव (30) अशी अटक आरोपीची नावे आहेत. तर अमरावती अंबिका प्रसाद यादव (58) असे हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव आहे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कशेळी येथील मैत्री कॉम्प्लेक्स येथे अमरावती अंबिका प्रसाद यादव या पती दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. तेथेच बबिता ही तिच्या पतीसोबत फारकत घेऊन आलेली पुतणी वास्तव्यास होती. दरम्यानच्या काळात मुलगा कृष्णा व बबिता यांच्यात प्रेम आलाप सुरू झाला. जे आईच्या नजरेस खटकत होते व त्यामुळे तिने मुलास चुलत बहिणी सोबत बोलण्यास मनाई केली होती. याचा राग मनात ठेवून कृष्णा याने बबिता हिची सोबत घेऊन आईची पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी कृष्णा यादव व त्याची चुलत बहीण बबिता यादव यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत दोघांना
बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संभाजी जाधव हे करीत आहेत.

मुलाने हत्या करून स्वत…च रचला बनाव

मुलाने 100 क्रमांकावर फोन करून कशेळी येथे आपल्या आईची हत्या झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास कळविली. पोलीस
कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. त्या ठिकाणी कृष्णा याने आपला काही मित्रांसोबत वाद झाला असता त्यात हाणामारी झाल्याने तेथे
माझी आई आली होती. मारहाण करणार्‍यांचा ठोसा आईला लागल्याने ती बेशुद्ध पडली व त्यात तिची हत्या झाल्याची बनावट कथा
पोलिसांना सांगितली. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता कृष्णाच्या बोलण्यात विसंगतपणा जाणवू लागल्याने पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यानेच ही हत्या बबिताच्या मदतीने केल्याची कबुली पोलिसांना दिली.

Back to top button