डोंबिवलीच्या खाजगी कार्यक्रमातील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भाषणाची जोरदार चर्चा

डोंबिवलीच्या खाजगी कार्यक्रमातील मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भाषणाची जोरदार चर्चा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील एका शाळेच्या खाजगी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. मंत्री चव्हाण यांचा टीकेचा रोख नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खा. पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज्यात भाजपची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी ४७२ कोटींचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली, कोणाला ते माहित आहे असा खोचक टोला त्यांनी नाव न घेता लगावला. त्यांच्या या टीकेची सध्या चर्चा जोरात रंगली आहे.

वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला होता. ज्यांनी कोणी हा निधी रद्द केला त्यांचीच हा निधी मंजूर करण्याची जबाबदारी आहे. ज्यांनी पहिल्यांदा जे खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. प्रस्ताव पुन्हा सादर करा असे लिहिले पण त्याला सुद्धा एक महिना झाला आहे. यामुळेच त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका असा उपहासात्मक सल्ला नाव न घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे. दरम्यान हा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

खड्ड्यांसाठी ॲप तयार करणार

रस्त्यावरील खड्डे ७२ तासात बुजविले गेलेच पाहिजेत यासाठी लवकरच एक अॅप तयार करणार असून खड्डा पडल्यापासून ७२ तासात बुजविला गेला नाही तर त्यानंतर जे होईल त्याला तेच लोक जबाबदार राहतील. हा निर्णय केवळ सार्वजनिक बांधकाम खात्यासाठीच नव्हे तर त्याचे परिपत्रक काढून राज्यभरात लागू केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनशनल स्कूलने तयार केलेल्या अद्ययावत ऑडीटोरीयमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news