ठाणे : रिफायनरी राजापूरलाच होणार : सामंत | पुढारी

ठाणे : रिफायनरी राजापूरलाच होणार : सामंत

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्रातच राहणार आणि तो राजापूरलाच होणार, या प्रकल्पाच्या उभारणीला कुठलीही मुदत दिलेली नाही. त्यामुळे विरोधकांचे आरोप म्हणजे अफवांचाच पाऊस आहे, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

वेदांता-फॉक्सकॉन गुजरातला गेले, आता रायगडाचा बल्कड्रगपार्क प्रकल्पही हलवला जात आहे, असे आरोप विरोधकांनी करतानाच रिफायरनी गुजरातला जाणार असल्याचे सांगितले होते. यावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या संदर्भात आज उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला हे मला कालच समजल्याचे उदय सामंत यावेळी म्हणाले. उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग एकमेकांशी संलग्न असणे गरजेचे आहे. यासंबंधी आम्ही धोरण तयार करत असल्याचे सामंत म्हणाले.

Back to top button