ठाणे : अरे, बाळ्यामामा कुठे आहे ?… शरद पवारांनी केली आदबीने चौकशी | पुढारी

ठाणे : अरे, बाळ्यामामा कुठे आहे ?... शरद पवारांनी केली आदबीने चौकशी

डोळखांब; दिनेश कांबळे :  ठाणे शहरात राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोणतीच कसर ठेवली नाही तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्षपदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती केली आहे. सुरेश म्हात्रे हे राजकारणात बाळ्या मामा याच नावाने ओळखले जातात. याच बाळ्या मामा यांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

झाले असे की, ठाण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार हे सायंकाळी आपल्या घरी जायला निघाले. तेव्हा गाडीत बसण्यापूर्वी पवारांनी बाळ्या मामा यांची केलेली विचारपूस. अरे, बाळ्या मामा कुठे आहे? असे विचारले असता बाजूला उभ्या असलेल्या जितेंद्र आव्हाडांनी अरे, बाळ्या मामा कुठे आहे! अशी आरोळी दिली. त्यानंतर बाळ्या मामा आणि त्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.आणि नेमका हाच व्हीडिओ सध्या तूफान गाजतोय.  पक्ष प्रमुख एवढ्या आस्थेने कार्यकर्त्यांना विचारतात, अशी चर्चा आता कार्यकर्त्यांमधून सूरु आहे. राजकारणात असूनही सामाजिक भान व गरजवंतांना दान या दोन गोष्टींमुळे बाळ्या मामा जिल्ह्यात सर्वपरिचित आहेत. विशेष म्हणजे भाजपचे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून बाळ्या मामा ओळखले जातात.

Back to top button