ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत | पुढारी

ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; तीन आरोपी अटकेत

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून तिघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या घटनेतील पीडित मुलीला तिघा नराधमांनी रिक्षातून निर्जनस्थळी नेले. येथे हातपाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीदिली. चितळसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button