डोंबिवलीत व्हेल माशाची १ कोटी ६० लाख रुपयांची उलटी जप्त, दोघे गजाआड | पुढारी

डोंबिवलीत व्हेल माशाची १ कोटी ६० लाख रुपयांची उलटी जप्त, दोघे गजाआड

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघांना डोंबिवलीतून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 1 कोटी 60 लाख रुपायांच्या किमतीची 725 ग्रॅम वजनाची उलटी जप्त करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हेल माशाची उलटी जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. त्याच्या उलटीला फार महत्व असल्याने तिची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. डोंबिवलीच्या बंदिश पॅलेस परिसरामध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती कल्याण पोलीस उपायुक्त यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस उपायुक्त पथकाला दिली. त्यानुसार पथकाने स्थानिक रामनगर पोलिसांसोबत बुधवारी मध्य रात्री 1 च्या सुमारास सापळा रचला होता. तस्करिसाठी आलेल्या नंदू आणि अर्जुन या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून व्हेल माशाची 725 किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button