ठाणे: बेपत्ता झालेली तीन मुले जंगलात सुखरूप सापडली | पुढारी

ठाणे: बेपत्ता झालेली तीन मुले जंगलात सुखरूप सापडली

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिरवली परिसरात असणाऱ्या चिलारवाडी येथील जयेश सुरेश वाघ (वय ५), रवि सुरेश आघाने (वय ५), नितेश मोहन कडाली (वय ५) ही  मुले शुक्रवारी (दि. ५) दुपारी बेपत्ता झाली होती. अखेर आज (दि.६)  जंगलात सुखरूपपणे आढळून आली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी तीन वाजता घराबाहेर खेळत होती. त्यानंतर ही तिन्ही मुले गायब झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही मुले खेळता खेळता पाण्यात वाहून गेली की कोणी त्यांना गायब केले, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती.
या मुलांचा सर्वत्र रात्रभर शोध सुरू होता. परंतु, ती कुठेही आढळून आली नाहीत. त्यामुळे मुलांच्या आई-वडिलांसह नागरिकांची चिंता वाढली होती. पोलीस, अग्निशामक दल, तसेच पाणबुडे यांच्या माध्यमातून मुलांचा शोध सुरू होता. अखेर नशीब बलवत्तर म्हणून शनिवारी सकाळी १०.१५ वाजता चिलारवाडीच्या जंगलात एका झाडाखाली तीन मुले सुखरूप आढळून आली. मुले सापडल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button