अटकेनंतर संजय राऊत यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ राणेंकडून व्‍हायरल | पुढारी

अटकेनंतर संजय राऊत यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ राणेंकडून व्‍हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आपल्याला कोठडीत ईडीकडून चांगली वागणूक दिली जात नाही. खोलीत एकच फॅन आहे. माझा श्वास गुदमरतो. अशी तक्रार न्यायालयात सुनावणी दरम्यान केली होती. त्यानतंर त्यांची खोली बदलण्यात आली. या खोलीला खिडकी आहे. यावरून राऊत यांची खिल्‍ली उडविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाला आहे.

माजी खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव, भाजप निलेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जेलमध्ये खिडकीवाली खोली मिळाल्यानंतरचा आनंद आणि खाली राऊत हे आनंदाने पेटी वाजवत आहे, असा ॲनिमेटेड व्हिडिओ त्‍यांनी ट्वीट केला आहे.

पाहा निलेश राणेंचे ट्वीट

Back to top button