डोंबिवली : वीजबिल ऑनलाईन भरण्यास सांगून दोन लाखांचा गंडा | पुढारी

डोंबिवली : वीजबिल ऑनलाईन भरण्यास सांगून दोन लाखांचा गंडा

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : थकीत वीजबिल ऑनलाईन भरण्यास सांगून दोन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. याप्रकरणी कल्याण पश्चिमेकडील मोहन प्राईडमध्ये राहणाऱ्या घनश्याम पुंजवानी (वय ६९ ) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोबाईलवर कॉल करून अज्ञात इसमाने वीज बिल पेंडिंग असून तत्काळ ऑनलाईन वीज बिल भरा. अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असे पुंजवानी यांना सांगण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस सुरु करण्यासाठी त्याच्या मोबाईलवर लिंक पाठवत त्यावर १० रुपये पाठवून लिंक सुरु करण्यास सांगितले. त्यांनी लिंक सुरु करताच त्याच्या खात्यातून ३ वेगवेगळ्या व्यवहारद्वारे १ लाख ९९ हजार ८९७ इतकी रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आला.
त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पंजवानी यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरु केला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button