पावसाचा फटका : डोंबिवलीत आवक घटल्याने भाजीपाला कडाडला | पुढारी

पावसाचा फटका : डोंबिवलीत आवक घटल्याने भाजीपाला कडाडला

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने भाजी पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आवक कमी झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरांनी उसळी घेतली आहे. कोथिंबीरची एक जुडी कल्याण कृषी बाजारात 60 रुपये झाली असून वाटाणा 1400 रुपये आणि फरसबी 80 रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात देखील भाज्यांचे दर 10 ते 20 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरांत प्राधान्याने जुन्नर, लातूर, पुणे , नाशिक जिल्ह्य़ांबरोबरच गुजरात, मध्यप्रदेश येथुन पालेभाज्यांची आवक होत असते. सध्या पावसामुळे आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या असून सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. कल्याण कृषी समिती बाजारपेठेत साधारण भाजीपाल्याच्या दररोजच्या 200 ते 250 गाड्या येतात. मात्र दोन दिवसांपासून गाड्यांची आवक कमी झाली असून बुधवारी 110 गाड्यांची आवक आली होती. तर आज केवळ 82 गाड्या आल्याची माहिती कल्याण बाजार कृषी समितीचे कणीक पाटील यांनी दिली. मुळातच आवक कमी असल्याने भाव वधारले आहेत.

घाऊक बाजाराचे दर

  • कोथींबीर : 60 जुडी
  • मेथी : 40
  • भेंडी : 70 kg
  • सिमला मिरची : 30 kg
  • गवार : 70 kg
  • फरजबी : 80 kg
  • वटाणा : 140 kg
  • दोडका : 60 kg

हेही वाचा : 

Back to top button