कल्याण पूर्व भागात पावसामुळे दरड कोसळली | पुढारी

कल्याण पूर्व भागात पावसामुळे दरड कोसळली

कल्याण; पुढारी  वृत्तसेवा :  रविवार  पासून मुसळधार  कोसळणा-या पावसाने सोमवारीही आपला  जोर  कायम  ठेवला होता. मूसळधार  पावसामुळे सकाळपासून कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमाननगर नजीकच्या टेकडीवरुन दरड कोसळली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या बैठया घरांच्या  जवळ पास  दरडीचे मोठे  दगड कोसळून पडले  मात्र  सुदैवाने  घटनेत  घरांचे  नुकसान  व  जीवित हानी टळली.  काही वेळातच महापालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी व आपतकालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. व बचाव  कार्याला  सुरुवात  करीत  टेकडीच्या  परिसरातील  नागरिकांना सुरक्षित  ठिकाणी  हालविले.

कल्याण  पूर्वेतील  पालिकेच्या ड प्रभाग  क्षेत्र  कार्यालयाच्या मागच्या  बाजूला व दुसर्‍या  बाजुने  हनुमानगरला लागून ही टेकडी वजा  छोटा  डोंगराचा  भाग  आहे. सोमवारी  दुपार पासून मुसळधार पावसाने  अधिकच जोर  धरला होता.   सायंकाळच्या  सुमारास  या छोट्या  डोंगराच्या टेकडीचा काही भाग कोसळला. व कोसळलेल्या  दरडी बरोबर  मोठे  दगड  खाली आले .

या टेकडीच्या  पायथ्यापाशी  बैठी  घरे  असुनही सुदैवाने  कोणतीही जीवीत हानी आणि वित्तहानी झाली नाही . या  घटनेची  माहिती  मिळताच  प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरातील पाच कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून राधा कृष्ण मंदिराच्या हॉलमध्ये त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती माहिती प्रभाग अधिकारी मुंबरकर यांनी दिली आहे.

   हेही वाचा 

Back to top button