धो धो पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ | पुढारी

धो धो पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. गेली दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाने बळीराजा सुखावला आहे. हवामान खात्याने आगामी 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बारवी धरणात गेल्या वर्षी 58.68 टक्के पाणीसाठा आहे. 1 जुलै अखेर धरणात 45.89 टक्के पाणीसाठा झाला आहे. याच गतीने पाण्याची आवक धरणात झाल्यास दरवर्षी प्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या – दुसर्या आठवड्यात धरण तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे. भातसा धरणात यंदा 33.11 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणात जून अखेर 38.49 टक्के पाणीसाठा होता.

गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाने मध्यम पण संततधार हजेरी लावल्याने त्याचा फायदा खरीपाच्या पीकांना होणार असल्याने बळीराजा सुखावला. परंतू पूर्ण जून महिनाभर जिल्ह्यात सरासरीच्या 20 ते 25 टक्केच पाऊस पडल्याने बळीराजा बरोबरच सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील महापालिकांनी पाणी कपातही लागू केली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 जुलै अखेर सुमारे 702. 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

यंदा मात्र 1 जुलै अखेर निम्मा देखील पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. जिल्ह्यात 1 जुलै अखेर 172.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात पेरण्याही खोळबंल्या होत्या. हवामान खात्याचे मुसळधार पावसाचे अंदाज चुकविणार्या पावसाने जूनच्या अखेरीस जाता – जाता मनावर घेतले. शहर आणि जिल्ह्यात 30 जून व 1 जुलै रोजी दमदार पाऊस झाला.

Back to top button