भिवंडीत तोतया पोलिसांचा महिलेला गंडा | पुढारी

भिवंडीत तोतया पोलिसांचा महिलेला गंडा

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा :  भिवंडी पोलीस उपायुक्‍त परिमंडळ क्षेत्रातील नारपोली व कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत ठाणे बायपास रस्त्यावर मागील तीन महिन्यात 20 हून अधिक तोतया पोलिसांकडून लुटीच्या घटना घडल्याने पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली असताना या रस्त्यांवरून प्रवास करणार्‍या महिलांच्या छातीत धडकी भरली आहे.

मानकोली रोड येथे राहणार्‍या सेवानिवृत्त शिक्षिका मनीषा मंगेश खातू या आपल्या पतीसोबत दुचाकीवरून भिवंडी येथील बँकेत निवृत्तिवेतनाची चौकशी करण्यासाठी निघाल्या असता.बायपास रस्त्यावरील टाटा आमंत्रा येथे पोहचल्या वर दुचाकी वरून आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी थांबवून आम्ही पोलीस आहोत, असे सांगून ओळखपत्र दाखविले. व पुढे चोरीसारखे प्रकार झाला आहे. तुम्ही दागिने काढून ठेवा, असे सांगितले. त्याच सुमारास या भामट्यांचे दोन साथीदार येऊन त्यांनी या महिलेस आम्हीसुद्धा दागिने काढून दिल्याचे सांगितल्याने विेशास पटलेल्या महिलेने आपल्या हातातील 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या बांगड्या या तोतया पोलिसांच्या हाती काढून दिल्या. तोतया पोलिसांनी महिलेच्या हाती देताना बनावट बांगड्या असलेली कागदी पुडी हाती दिली. त्यानंतर चार ही तोतया पोलीस बनून आलेले भामटे दोन वेगवेगळ्या दिशेने पसार झाले.

या प्रकरणी फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षिका असलेल्या महिलेने कोनगाव पोलिसांकडे तक्रार दिल्याने चार तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button